संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य
संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक
क्षेत्रातील कार्य
नित्य मदतकार्य
● संस्कृती संवर्धिनी संस्था, अनेक गरीब होतकरु विद्यार्थ्यांच्या शाळेच्या /कॉलेजच्या फीचा काही भाग भरते, त्यांना शैक्षणिक गरजेनुसार वस्तूरुपात मदत करते.
● दुर्धर आजार झालेल्या गरीब रुग्णांच्या दवाखान्याच्या / ट्रीटमेंटच्या फीचा काही भाग भरते, त्यांना औषधे, वस्तूरुपात मदत करते.
● अशा रुग्णांवर अवलंबून असलेल्या कुटुंबाची उदरनिर्वाह व्यवस्था रुग्णाच्या आजारपणामुळे कोलमडलेली असल्यास किरणसामान वगैरे देऊन कुटुंबालादेखील मदत करते
● शालेय संस्थांना, त्यांच्या गरजेनुसार, बैठक व्यवस्थेसाठी, पुस्तक/ग्रंथ खरेदी इत्यादीसाठी मदत करते.
● शालेय मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, अंतरंग व्यक्तिमत्व विकास घडावा, यासाठी बाह्य संसाधनासमवेतच, संतमाहात्मे, सत्पुरुष, थोर व्यक्ती यांची चरित्रपुस्तके, विज्ञान विषयक ग्रंथ, भारताची संस्कृती, इतिहास आदी सांगणारे ग्रंथ यांचे वाटप करते, निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करुन शालेय मुलांना लेखन, वाचनासाठी प्रोत्साहित करते.


आपत्कालीन सेवाकार्य
इ. स. २०२० - २०२१ या काळात, कोरोना महामारीवेळी, संस्थेच्या वतीने पंचवीस गरजू कुटुंबांना दरमहा किराणासामानाचे वितरण केले गेले.

इ. स. जून-२०२० मध्ये झालेल्या "निसर्ग चक्रीवादळा" नंतर, दापोली तालुक्यातील आडे, आंजर्ले, केळशी, मुर्डी येथे , वादळपिडीत लोकांना आवश्यक वस्तू (किराणासामान, वस्त्रे, अंथरुण-पांघरुण, घर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या गोष्टी) इत्यादींचा पुरवठा केला गेला. तेथील घरे, शाळा, मंदिरे, वाचनालये अशा सर्व ठिकाणी जाऊन मदत केली गेली. लोकांची आर्थिक उत्पन्नांची साधने (जसे नारळाच्या बागा) पूर्ववत होण्याच्या दृष्टीने शक्य ती सर्व मदत केली गेली

इ. स. जुलै-२०२१ मध्ये चिपळूणला महापूर आला. संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. संस्कृती संवर्धिनी संस्थेच्या वतीने पुढील वर्षभरात जवळपास दहा लक्ष रुपयांचे मदतकार्य केले गेले. यामध्ये मुखतः अन्नवाटप, किराणासामान वाटप, वस्त्रे, ब्लँकेट अशा गरजेच्या गोष्टी वस्तूरुपाने देणे, त्याचबरोबर घर दुरुस्ती साधने देणे, फरशा बदलण्यास, छप्पर दुरुस्तीस मदत करणे, घरातील वस्तू - ट्यूबलाईट, फॅन इत्यादी देणे, गॅसशेगड्या, फिल्टर, मिक्सर असे गृहोपयोगी साहित्य देणे, इत्यादी केले गेले.


टीपा व काही क्षणचित्रे
● ज्या लोकांना मदत केली जाते, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन, संस्कृती संवर्धिनी संस्थेचे कार्यकर्ते परिस्थितीची प्रत्यक्ष पडताळणी/खात्री करतात, मगच मदत केली जाते.
● संस्कृती संवर्धिनी संस्था लोकांना मदत करताना शक्यतोवर वस्तूरुपातच करते.
● शाळा / कॉलेज / रुग्णालये यांची फी भरण्यास साहाय्य इत्यादी आर्थिक मदत ही व्यक्ती अथवा रुग्ण यांच्या हातात न देता शाळा/रुग्णालये येथे प्रत्यक्ष जाऊनच केली जाते.

×
×
×