संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन परमार्थ ग्रंथालय
संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन
परमार्थ ग्रंथालय
संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन परमार्थ ग्रंथालय
ग्रंथालय स्थापना
पुस्तकञ्च् महेशानि यद्गृहे विद्यते सदा |
काश्यादीनि च तीर्थानि सर्वाणि तस्य मन्दिरे || तं.सं.४.१७.६
भगवान आशुतोष म्हणतात की , "हे पार्वती, ज्या स्थानी सद्-ग्रंथ भांडार नित्य विराजमान असते, ते स्थान शिवालयासमान पवित्र होय आणि तेच काशी आदी सर्व तीर्थ क्षेत्रांचे निवासस्थानही होय !"

      पारमार्थिक ग्रंथांच्या अभ्यास, मनन व चिंतनाने, साधक-जिज्ञासू-मुमुक्षू यांच्या जीवनात, नीती, सदाचार, बंधुभाव, मानवता, जीवनातील मूल्ये व चारित्र्य यांची वाढ होऊन त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने पवित्र व उन्नत होऊ लागते. असे पारमार्थिक ग्रंथ उपलब्ध करुन देणारी ग्रंथालये ही शिवालयासमान पवित्र स्थानच असतात. "ज्ञान आणि संस्कृतीचे प्रवेशद्वार" म्हणून ग्रंथालये समाजात मूलभूत भूमिका बजावतात, म्हणून असे ग्रंथालय स्थापन करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली आणि "संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन परमार्थ ग्रंथालया"ची स्थापना झाली

ग्रंथालय स्थापना दिन - भगवद्पूज्यपाद श्रीशंकराचार्य जयंती, दिनांक २२ एप्रिल २०१५. जागतिक पुस्तक दिन.


ग्रंथालय माहिती
ग्रंथालय वेळ
सकाळी : ९ ते १२
सायंकाळी : ५ ते ७
साप्ताहिक सुट्टी : गुरुवार

ग्रंथालयाचे सभासदत्व घेण्याविषयी माहिती
● मासिक सभासदत्व - १ पुस्तक-ग्रंथ : ३०/- रुपये मात्र. २ पुस्तके-ग्रंथ : ५०/- रुपये मात्र.
● वार्षिक सभासदत्व - १ पुस्तक-ग्रंथ : ३३०/- रुपये मात्र. २ पुस्तके-ग्रंथ : ५५०/- रुपये मात्र.
टिपा
१. सभासदत्व फी ही केवळ घरी पुस्तक/ग्रंथ नेणाऱ्यांसाठी आकारली जाते. ग्रंथालयात बसून ग्रंथालयातील पारमार्थिक ग्रंथांचे वाचन / अभ्यास करणे पूर्णतः मोफत आहे.
२. पारमार्थिक मासिके, धार्मिक, आध्यात्मिक विषयांचे दिवाळी-विशेषांक यासाठी कोणतीही वेगळी/विशेष फी आकारली जात नाही.

सद्य सभासद / वाचक / अभ्यासक संख्या
ग्रंथालयाला दर महिन्यात साधारण शंभरहून अधिक (१००+) लोक भेट देतात. यात संतसाहित्य अभ्यासक, प्राचीन तत्त्वज्ञान अभ्यासक, संशोधक, साधक, जिज्ञासू, मुमुक्षु, परीक्षार्थी (दासबोध परीक्षा, श्रीज्ञानेश्वरी परीक्षा इत्यादी परीक्षा देणारे), कीर्तनकार, प्रवचनकार आणि नित्य सभासद आदी असतात.

परमार्थपुस्तकप्रेमी व अभ्यासकांसाठी महत्त्वाची माहिती
● अभ्यासकांच्या सोयीच्या दृष्टीने ग्रंथ विभाग, मांडणी व रचना
● अभ्यासकांसाठी स्वतंत्र विनामूल्य बैठक व्यवस्था
● शुद्ध तत्त्वज्ञान ग्रंथ व निवडक पारमार्थिक वाङ्मय खरेदी करण्यावर ग्रंथालयाचा भर आहे.
● पारमार्थिक ग्रंथ देणगी स्वरुपातदेखील स्वीकारले जातात.


ग्रंथालयात उपलब्ध वाङ्गमय
दहा हजाराहून अधिक (१०,०००+) पारमार्थिक ग्रंथ, पुस्तके, मासिके, पाक्षिके व इतर साहित्य वाचकांस व अभ्यासकांस उपलब्ध आहे.

● श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय, श्रीभागवत संप्रदाय, शक्तिपातयोगविद्या, प्राचीन तत्त्वज्ञान आणि परमार्थ-वाङ्मयाचे अनमोल, विशुद्ध आणि आत्यंतिक महत्त्वाचे ग्रंथ
● संतवाङ्गमय, भगवद्पूज्यपाद श्रीशंकराचार्य, प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांचे वाङ्गमय
● वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत, श्रीमदभागवत आदी धर्मग्रंथ
● नारदीय कीर्तन मागदर्शन करणारे १००+ ग्रंथ
● ज्योतिष, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, क्षेत्रमाहात्म्य असे ग्रंथ
● श्रीवामनराज प्रकाशन, कल्याण, गीताप्रेस, रामकृष्ण मठ व विविध धार्मिक, आध्यात्मिक, पारमार्थिक प्रकाशनांचे ग्रंथ
● संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी आदी विविध भाषांतील वाङ्गमय
● हिंदू धर्मग्रंथांसहित, मुस्लिम / पारशी / जैन / बौद्ध / ख्रिश्चन व इतरही अनेक धर्म/ संप्रदायांचे पारमार्थिक ग्रंथ

संदर्भ विभाग :
अभ्यासक धर्मकोश, अमरेंद्र गाडगीळ संपादित रामकोश, श्री जोगदंड यांचे गीतागाथा व इतर अनेक दुर्मिळ ग्रंथ संदर्भासाठी उपलब्ध.


क्षणचित्रे
×
×
×
×
×
×